शनी जयंतीनिमित्त जाम सावळीत भाविकांची अलोट गर्दी

    दिनांक :16-May-2026
Total Views |
भाविकांनी घेतले स्वयंभू मूर्तीचे दिव्य दर्शन
 
नागपूर,
Jam Sawali ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या, शनी जयंती आणि शनिवार या अद्भुत त्रिवेणी महासंयोगाच्या निमित्ताने हनुमान मंदिर हनुमान लोक, जाम सावळी धाम येथे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे एक अलौकिक दृश्य पाहायला मिळाले. शनैश्चरी एकाच दिवशी येणे अत्यंत फलदायी मानले जाते; याच कारणामुळे पहाटेपासूनच मंदिर परिसर भाविकांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
 
 
jamsawali-hanuman
 
Jam Sawali  हनुमंतांच्या स्वयंभू निद्रिस्त मुद्रेतील दिव्य मूर्तीचे दर्शन घेऊन भाविकांनी पुण्य लाभ घेतला. पहाटे पारंपरिक पूजा-अर्चा आणि विशेष अभिषेकाने झाली. शंखनाद आणि टाळ-मंजिरांच्या गजरात जेव्हा आरती झाली, तेव्हा संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. यानंतर महाआरतीचे दृश्यही अत्यंत विहंगम होते, जिथे मावळत्या सूर्याची किरणे आणि विद्युत रोषणाईने संपूर्ण जाम सावळी धामाला एक अलौकिक आणि दिव्य रूप प्राप्त करून दिले होते. संस्थानचे अध्यक्ष गोपाल शर्मा यांनी पुढे सांगितले की, भाविकांना कडक ऊन आणि उष्णतेपासून वाचवण्यासाठी मंदिर परिसर व मार्गावर थंड पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात होती.