नागपूर,
animals lovers देशातील गुन्हेगारीची नाेंद ठेवणाऱ्या नॅशनल क्राईम रेकाॅर्ड ब्युराेने (एनसीआरबी) प्रथमच प्राण्यांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांची स्वतंत्र नाेंद आपल्या ‘क्राइम इन इंडिया 2024’ अहवालात केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, प्राण्यांवरील क्राैर्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात नाेंदविण्यात आल्या आहेत.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये देशभरात प्राण्यांवरील क्राैर्याच्या एकूण 9 हजार 39 घटना नाेंदविण्यात आल्या. या प्रकरणांत 10 हजार 312 जणांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांमध्ये दाेषाराेपपत्र दाखल करण्याचे प्रमाण 96.7 टक्के असून, दाेषसिद्धीचे प्रमाणही सुमारे 80.5 टक्के इतके नाेंदविण्यात आले आहे.
राज्यानुसार पाहता, 2 हजार 927 घटनांसह प्राण्यांवरील अत्याचारात महाराष्ट्र देणात पहिल्या स्थानावर आहे. प्राण्यांवरील हिंसाचाराचे वाढते प्रमाण आणि त्याबाबत निर्माण हाेत असलेली जागरूकता लक्षात घेता, या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त हाेत आहे. प्राणी संरक्षणासाठी कार्यरत संघटनांनी एनसीआरबीच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वी ‘प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल्स अॅक्ट, 1960’ अंतर्गत नाेंदविण्यात येणारे गुन्हे स्वतंत्र श्रेणीत समाविष्ट केले जात नव्हते. त्यामुळे अशा घटनांची सुस्पष्ट राष्ट्रीय आकडेवारी उपलब्ध नव्हती. आता स्वतंत्र नाेंदीमुळे प्राण्यांवरील अत्याचारांकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाईल, अशी अपेक्षा प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीतून देशभरात भटक्या प्राण्यांवरील हिंसाचार, कुत्र्यांना विष देणे, त्यांचे बेकायदेशीर स्थलांतर, प्राणीप्रेमी व ीडर्सना हाेणारा त्रास, आश्रयस्थळांमधील गैरव्यवस्था तसेच भटक्या प्राण्यांवरील अमानुष हल्ल्यांबाबत वाढती चिंता अधाेरेखित झाली आहे.
उपराजधानीतही अमानुषतेच्या घटना वाढल्या
‘सेव्ह स्पीचलेस’ संस्थेर्माफत भटक्या श्वानांसाठी कार्य करणाऱ्या स्मिता मिरे यांनी सांगितले की, नागपुरातही गेल्या काही वर्षांत प्राण्यांवरील हिंसेच्या अनेक धक्कादायक घटना समाेर आल्या आहेत. भटक्या कुत्र्यांना विष देणे, प्राण्यांवर क्रूर हल्ले करणे, जनावरांची बेकायदेशीर वाहतूक तसेच प्राणीप्रेमींना त्रास देण्याच्या घटनांमुळे चिंता वाढली आहे. अलीकडेच झिंगाबाई टाकळी परिसरात पाच भटक्या कुत्र्यांना विष देऊन ठार मारल्याचा आराेप झाला हाेता. तसेच काही पिल्लांवर अॅसिड टाकून त्यांना जाळण्यात आल्याच्या घटनाही समाेर आल्या हाेत्या.animals lovers त्यामुळे प्राणी संरक्षण कायद्यांची कठाेर अंमलबजावणी, दाेषींवर कठाेर कारवाई, आश्रयस्थळांची सुधारित व्यवस्था, वैज्ञानिक पद्धतीने भटक्या प्राण्यांचे व्यवस्थापन तसेच प्राणी ीडर्स आणि रेस्क्यू कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी केली आहे. प्राण्यांवरील क्राैर्याचा संबंध समाजातील वाढत्या हिंसक प्रवृत्तींशी असल्याने अशा गुन्ह्यांकडे किरकाेळ स्वरूपात पाहू नये, असेही त्यांनी नमूद केले.