चामोर्शी,
आजच्या डिजीटल स्पर्धेत मोबाईलचा वाढता वापर यामुळे दिवसेंदिवस Mobile theft मोबाईल चोरीस जाणे, हरवणे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा घटनेतून मोबाईलचा गैरवापर होत सायबर गुन्हे घडण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी चामोर्शी पोलिसांनी तत्परता दाखवत तांत्रिक बाबीचा वापर करून चोरीस गेलेले 2 लाख 39 हजार रुपये किमतीचे 11 मोबाईल शोधण्यात यश मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली.
Mobile theft चामोर्शी परिसरातून गहाळ व चोरी झालेले 11 अँड्रॉइड मोबाईल सीईआयआर पोर्टलच्या सहाय्याने व तांत्रिक कौशल्याचा वापर करून चोरीस गेलेले मोबाईल चामोर्शी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस अंमलदार मनीषा चिताडे व पोलिस अंमलदार भावेश वरगंटीवार यांनी ही उल्लेखनीय कामगिरी करत शोधून काढण्यात यश मिळविले. हे मोबाईल पोलिस ठाण्याच्या वार्षिक निरीक्षणासाठी नुकतेच आलेले गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक योगेश कुमार यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. याप्रसंगी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिकेत हिरडे उपस्थित होते.