नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसची नियमित सेवा सुरु
नागपूर
Nagpur to Madgaon Express द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसची नियमित सेवा सुरु झाल्याने नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास अधिक आरामदायक झाला आहे. सध्याच्या घडीला दोन दिवस नागपूरवरुन आणि दोन दिवस मडगाव येथून ही गाडी धावणार आहे. पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याने आगामी काही दिवसात ही मडगाव एक्सप्रेस दररोज धावेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
मध्यवर्ती नागपूर रेल्वेच्या स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर दुपारी ३ वाजता नागपूर ते मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या प्रसंगी महापौर नीता ठाकरे, आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय महाव्यवस्थापक विनायक गर्ग, जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद आदी उपस्थित होते.
विकासाला चालना मिळणार
नितीन गडकरी पुढे म्हणाले, नागपूर ते मडगाव एक्सप्रेसला सुरु झाल्याने पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. विदर्भ, कोकण आणि गोवा यांच्या दरम्यान प्रवास करणार्या प्रवाशांना मडगाव एक्सप्रेसच्या माध्यमातून प्रवास करणे अधिक सोयींचे झाले आहे. महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातील रेल्वे जोडणी सुधारण्याच्या दिशेने टाकलेले रेल्वेचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल होय. अजनी व मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकाचा पूर्णत: कायापालट होत आहे. यामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधा रेल्वेच्या माध्यमातून मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे नागपूर विमानतळ
Nagpur to Madgaon Express मुख्य रेल्वेस्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर आहे. अजनी स्थानकाच्या समोरील कारागृहाची जागा देखील मिळणार आहे. कारागृहासाठी पाटणसावंगीजवळ देण्याचे नियोजित आहे. आगामी काळात नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे नागपूर विमानतळ तयार होणार आहे. यामुळे नागपूर शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलणार आहे. संत्रा मार्केट येथे नवीन बस स्टेशन तयार करण्याचे नियोजित असून शहराच्या चारही बाजूने आता मेट्रोचा विस्तार केल्या जात आहे. कन्हान ते बुटीबोरीपर्यंत मेट्रोचा विस्तार होत असल्याने नागरिकांना प्रवास होणार आहे.
लॉजिस्टिक पार्क विकसित होणार
देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर असल्याने येथे लॉजिस्टिक पार्क देखील विकसित केल्या जात आहे. देशाच्या चहुबाजूने वाहतूकीसाठी नागपूर शहर सर्वद़ृष्टीने सोयींचे झाले आहे. अजनी रेल्वे स्टेशन जवळील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धान्य भंडाराकरीता पर्यायी जागा उपलब्ध करुन दिल्या जात आहे. नव्या लॉजिस्टिक पार्कच्या माध्यमातून अधिकाधिक उपलब्ध होणार आहे.