नवी दिल्ली
Silver Imports मध्यपूर्वेतील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाèया जलवाहतुकीच्या प्रभावाने कच्च्या तेलाचे वाढलेले दर आणि डॉलर्सच्या तुलनेत रुपयांत होणारी घसरण पाहता केंद्र सरकारने उपाययोजना राबवायला सुरुवात केली. याचाच भाग म्हणून परदेशी चलनाच्या बचतीसाठी सरकारने शनिवारी चांदीच्या आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत.
Silver Imports सरकारच्या नव्या निर्णयानुसार, आता चांदीच्या अनेक प्रकारांना निशुल्क आयात धोरणातून काढून मर्यादित आयात श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता परदेशातून चांदीच्या आयातीसाठी सरकारची परवानगी घेणे अनिवार्य राहणार आहे. चांदीची आयात करायची असल्यास व्यावसायिकांना ठोस कारण द्यावे लागेल. उद्योग वाणिज्य मंत्रालयाच्या परवानागीशिवाय चांदीची आयात करत येणार नाही. यापूर्वी सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्क 15 टक्क्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.