ऑनलाइन औषध विक्रीविरोधात20 मे रोजी औषध दुकाने बंद

    दिनांक :16-May-2026
Total Views |
वणी, 
Opposition to Online Medicine Sales ऑनलाइन औषध विक्रीच्या वाढत्या प्रथेविरोधात ऑल इंडिया औषधी संघटनेच्या आवाहनानुसार येत्या 20 मे रोजी गुरुवारी देशभर औषध विक्री बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने दिली आहे. ऑनलाइन औषध विक्री ही रुग्णांच्या जीवाशी खेळणारी बाब ठरत असून अनेकदा औषधांची गुणवत्ता, एक्सपायरी मुदत तसेच औषधांमुळे होणाèया दुष्परिणामांची जबाबदारी निश्चित राहत नाही. अशा प्रकारांमुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
 
 
Online Medicine Sales
 
Opposition to Online Medicine Sales  तसेच, नशेच्या औषधांची ऑनलाइन सहज उपलब्धता ही गंभीर सामाजिक समस्या बनत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीचा (प्रिस्क्रिप्शन) गैरवापर करून अशा औषधांची विक्री होत असल्याने युवकांमध्ये व्यसनाधीनतेचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ऑनलाइन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसायावर परिणाम होत असून बेरोजगारीची समस्या निर्माण होत असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने योग्य ती कार्यवाही करून ऑनलाईन औषध विक्रीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार, 20 मे रोजी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात येणार असून सर्व नागरिकांनी आवश्यक औषधांची खरेदी 19 मेपूर्वी करून घ्यावी, असे आवाहन वणी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उरकुडे यांनी केले आहे.