सतत विद्युत पुरवठा खंडित

    दिनांक :16-May-2026
Total Views |
त्रस्त नागरिकांचे निवेदन

नेर, 
Power Supply Interrupted महाराष्ट्र राज्य वीज वितरणच्या नेर कार्यालयाचे सहायक अभियंता यांना मोझर परिसरातील नागरिकांनी रोज 6 ते 7 तास विद्युत पुरवठा खंडित राहत असल्यामुळें होणाèया त्रासाबद्दल निवेदन दिले. अनेक महिन्यांपासून वीज वितरणकडून सातत्याने विद्युत पुरवठा खंडित केल्या जात आहे. याबद्दल वारंवार तोंडी स्वरूपात कळविल्यानंतरही वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे मोझर परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.
 
ner
 
Power Supply Interrupted  नागरिकांना खंडित वीज पुरवठ्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार यात करण्यात आली आहे. यावेळी राजू निमकर, दिलेश्वर महल्ले, मिनेश कठाळे, साहेबराव राऊत, पवन माहुरे, गजानन ठाकरे, ज्ञानेश्वर माहुरे, रवींद्र वीर, सौरभ शिंदपुरे, अवधूत काळे, विलास ठाकरे, दिनेश कोकाटे, रितेश शेंदुरकर यांची उपस्थिती होती.