बुलढाणा,
गाव तिथे शाखा घर तेथे शिवसैनिक आणि बूथ निहाय बिएलए यांच्या नेमणुका करण्याचा संकल्प शिवसेनेच्यावतीने करण्यात आला असून प्रत्येक बूथवर इङअ नेमणुका लवकरात लवकर पूर्णच्या करण्याच्या सुचना शिवसेना नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री Prataprao Jadhav प्रतापराव जाधव यांनी शिवसेना पदाधिकार्यांना केल्या आहेत एसआयआर अभियानाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर सुरू असलेल्या शिवसेना बी. एल. ए नेमणूक अभियान संदर्भात बुलढाणा शहरातील वारकरी भवन येथील सभागृह येथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील आणि चिखली शहरातील सुखकर्ता लॉन्स येथे चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते यांचे बिएलए २ संदर्भात प्रशिक्षण शिबीर दि. १६ मे रोजी संपन्न झाले.
Prataprao Jadhav त्यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना नेते तथ केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव बोलत होते या प्रशिक्षण शिबीरास आ. संजय गायकवाड आणि बुलढाणा लोकसभा संपर्कप्रमुख संजय सोनार,शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वक संजय अगलदरे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले. यामुळे आज जनतेकडून आपल्याला पाठिंबा मिळत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक बळकट करून सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करण्यासाठी सर्वांनी संघटित होणे गरजेचे आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटन बळकटीकरण, बूथस्तरावरील नियोजन, तसेच स्थानिक पातळीवर प्रभावी रणनीती कशी राबवावी नामदार प्रतापराव जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखओमसिंग राजपूत,युवासेना जिल्हाप्रमुख ऋषी जाधव,शिवसेना उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील शिवाजी देशमुख,निलेश गुजर,शिवसेना तालुका प्रमुख गजानन मोरे,धनंजय बरोटे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.मायाताई म्हस्के अनुजाताई सावळे यांच्यासह बुलडाणा आणि चिखली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,युवासेना,महिला आघाडी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.