promotion of assistant inspectors राज्य पाेलिस दलात बदल्या आणि पदाेन्नतीचे वार वाहत असून गेल्या काही दिवसांत पाेलिस उपायुक्त, अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या तर नुकताच पाेलिस महासंचालकांकडून हिरवी झेंडी मिळाल्याने राज्यातील सहायक पाेलिस निरीक्षकांनाही निरीक्षक पदावर बढती देण्यात येत आहे. राज्यातील 73 अधिकाèयांना पाेलिस निरीक्षक पदावर पदाेन्नती देण्यासाठी महसूल संवर्ग मागविण्यात आला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील पाेलिस अधिकाऱ्यांच्या पदाेन्नत्या आणि बदल्या रखडल्या हाेत्या. पाेलिस उपनिरीक्षक ते डीवायएसपी, एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदाेन्नत्या रखडल्यामुळे राज्य पाेलिस दलात नैराश्याचे वातावरण हाेते. न्यायालयीन बाजू आणि तांत्रिक अडचणींवर मात करुन 14 मे राेजी राज्यातील सहायक पाेलिस निरीक्षकांना बढती देण्यासाठी महसूल संवर्गाची मागणी करण्यात आली आहे. गेल्या दाेन महिन्यांपूर्वी सहायक पाेलिस उपनिरीक्षक सत्र क्रमांक 106 मधील अधिकाèयांना पाेलिस निरीक्षक पदावर पदाेन्नती देण्यात आली. त्याच सत्रातील जवळपास 83 सहायक निरीक्षकांची बढती न्यायालयीन आणि तांत्रिक अडचणींमुळे थांबविण्यात आली हाेती. मात्र, आता पाेलिस महासंचालक सदानंद दाते यांनी सकारात्मक निर्णय घेत पदाेन्नतीची यादी काढण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहून राज्यातील 73 सहायक पाेलिस निरीक्षकांच्या पदाेन्नतीचा मार्ग माेकळा केला. त्यामुळे अधिकारी वर्गात आनंदी आनंद झाला आहे.