पेट्रोल डिझेलसाठी वाहनधारकांच्या रांगा

    दिनांक :16-May-2026
Total Views |
रिसोड,
petrol and diesel रिसोड शहरात पेट्रोल व डिझेलच्या संभाव्य तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली असून, अनेक जण कॅन, ड्रम व विविध भांड्यांमध्ये इंधन साठवण्यासाठी रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर वाहनांच्या तसेच कॅन घेऊन आलेल्या नागरिकांच्या रांगा लागल्याने काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पेट्रोल पंप चालकांची तारांबळ उडाली असून, सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
 

petrol and diesel 
 
ज्वलनशील पदार्थ असलेल्या पेट्रोल-डिझेलची मोठ्या प्रमाणात कॅनमध्ये विक्री होत असल्याने अपघाताचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांमध्ये अफवा आणि भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ आदेश काढून कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल देण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.petrol and diesel तसेच आवश्यक त्या प्रमाणातच इंधन वितरण करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.प्रशासनाने योग्य वेळी निर्णय न घेतल्यास आगामी काळात इंधनटंचाईसारखी परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शयता व्यक्त केली जात आहे.
 
वाशीम शहरातील पेट्रोल पंपावर दोन दिवसापासून वाहनधारकांच्या इंधन घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. तर काही पेट्रोल - डिझेल नाही, असे फलक दिसून आले. मालेगाव, मंगरुळनाथ, कारंजा, मानोरा शहर व महामार्गावरील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी तासनतास रांगेत उभे राहून पेट्रोल, डिझेल भरुन घेतले