देवळी,
Rajesh Bakane तालुयातील भूमिहीन व गरजू नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने गेल्या सहा महिन्यांत तब्बल १७०० लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण करण्यात आले आहे. देवळी व परिसरातील सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून विविध प्रकरणांचा पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन आ. राजेश बकाने यांनी केले. देवळी तहसील कार्यालयाच्या वतीने १५ मे रोजी नाट्यगृह देवळी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आमदार आपल्या दारी जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Rajesh Bakane आ. राजेश बकाने यांच्या हस्ते विविध शासकीय विभागांमार्फत नागरिकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. महसूल, कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य, वन विभाग, पंचायत, आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. वनजमीन, चराई क्षेत्र व झुडपी जंगलाशी संबंधित अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असली तरी त्यावर तोडगा काढण्यासाठी आगामी अधिवेशनात आपण आवाज उठविणार असल्याचे आ. बकाने म्हणाले. या अभियानांतर्गत सुधारीत सातबारा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कागदपत्रे, नवीन रेशन कार्ड, भूमी अभिलेख दस्तऐवज तसेच घरकुल लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
Rajesh Bakane यावेळी विकास कामांचाही आढावा घेण्यात आला. देवळी येथे दोन कोटी रुपयांच्या निधीतून स्विमिंग पूल, यशोदा नदी घाट सौंदर्यीकरण, नगरपरिषदेच्या वर्धित भागातील उद्यान, पोलिस स्टेशन परिसरातील सभागृह, समाज भवन तसेच इंडोअर स्टेडियम परिसरात वॉकिंग ट्रॅक व क्रीडा सुविधांच्या कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती आ. बकाने यांनी दिली. यावेळी तहसीलदार समर्थ क्षीरसागर, नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, मुख्याधिकारी नेहा आकोडे, नगरसेवक विलास जोशी, संतोष भोयर, प्रमोद ढोक, अशोक राऊत, मंगला पिंपळकर, विस्तार अधिकारी प्रमोद बिडवाईक, आदी उपस्थित होते.