ट्रम्प यांच्या हत्येसाठी 558 कोटी रुपयांचे बक्षीस

इब्राहिम अझीझी यांची माहिती, इराणच्या संसदेत ठराव मंजूर

    दिनांक :16-May-2026
Total Views |
तेहरान
Trump's Assassination अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युद्ध गुन्हेगार घोषित करण्याचा आणि त्यांना ठार करणाèयाला 50 दशलक्ष युरोंचे (558 कोटी) बक्षीस देण्याचा ठराव इराणच्या संसदेत मंजूर करण्यात आल्याची माहिती संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अझिझी यांनी शनिवारी दिली.
trump 
 
Trump's Assassination अझिझी यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्यावर सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्यासह देशातील 50 नेत्यांच्या हत्येचा आरोप आहे. इस्लामिक प्रजासत्ताकाच्या लष्करी आणि सुरक्षा यंत्रणांनी प्रत्युत्तरात्मक कारवाई म्हणून एक योजना केली. या योजनेला संसदेने मंजुरी दिली आहे. याशिवाय ट्रम्प यांची हत्या करणाèयाला 558 कोटींचे बक्षीस देण्याचा ठराव पारित करण्यात आला. जी कोणतीही व्यक्ती किंवा गट ट्रम्प यांना ठार करेल त्यांना ही रक्कम दिली जाईल. सुरक्षा यंत्रणांनी ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा सूड घेण्यासाठी तयार केलेली योजनेला संसदेने मंजुरी दिली आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. अयातुल्ला यांच्या हत्येचा सूड कोणत्याही परिस्थितीत घेतला जाईल.