पातुमवान
Thailand Open Badminton दोन वेळा विजेते ठरलेले सात्त्विकसाईराज रन्कीरेड्डी आणि चिराग शेट्टीने पुन्हा एकदा थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी थायलंडमधील निमिबुत्र स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारतीय जोडीने मलेशियाच्या गो झे फेई व नूर इझुद्दीन या जोडीचा 19-21, 22-20, 21-16 अशा गुणांनी पराभव केला. सात्विक-चिराग गत वर्षीच्या स्पर्धेला मुकले होते.
Thailand Open Badminton पहिल्या गेमची सुरुवात मलेशियाच्या जोडीसाठी अधिक चांगली ठरली; 7-7 अशा बरोबरीनंतर त्यांनी सामन्यावर ताबा मिळविला व 15-9 अशी सहा गुणांची आघाडी घेतली. सात्त्विक व चिरागने गेमच्या उत्तरार्धात गुणांमधील ही तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला असला, तरी मलेशियाच्या जोडीने आपला दबदबा कायम राखत हा गेम 21-19 ने जिंकला.
Thailand Open Badminton दुसरा गेम अत्यंत चुरशीचा ठरला. दोन्ही जोड्यांनी गुणांसाठी कडवी झुंज दिली; अखेर भारतीय जोडी 20-18 अशा स्थितीत गेम पॉईंटवर पोहोचली. हार मानण्यास नकार देत, गो आणि नूर या जोडीने दोन गेम पॉईंट्स वाचवले आणि गुणसंख्या पुन्हा बरोबरीत आणली; मात्र त्यानंतर भारतीय खेळाडूंनी मुसंडी मारत हा गेम 22-20 ने जिंकला आणि सामन्याचा निकाल तिसèया (निर्णायक) गेमवर नेला.
Thailand Open Badminton 2019 आणि 2024 मध्ये विजेते ठरलेल्या सात्त्विक व चिरागने त्यानंतर तिसèया गेमवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. त्यांनी 21-16 अशा सहज विजयासह अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या विजयासह, त्यांनी या हंगामातील आपल्या पहिल्याच अंतिम फेरीतील प्रवेशाची नोंद केली.
Thailand Open Badminton अंतिम सामन्यात भारतीय जोडीचा सामना इंडोनेशियाच्या लिओ रॉली कार्नांडो आणि डॅनियल मार्थिन विरुद्ध चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्यातील सामन्यातील विजेत्याशी होईल.