स्कूल ऑफ स्कॉलर्सचे अभूतपूर्व यश

    दिनांक :16-May-2026
Total Views |
नागपूर,
School of Scholars स्कूल ऑफ स्कॉलर्स, अत्रे लेआउट यांनी सीबीएसई इयत्ता बारावी २०२५–२६ च्या निकालात शहरात अव्वल स्थान पटकावत पुन्हा एकदा उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
 
 
se
 
 
शाळेतील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शहरातील पहिल्या दोन स्थानांवर कब्जा केला. आराध्य सिंह याने ९८.६% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला, तर ओजस दांडेकर याने ९८.२% गुणांसह द्वितीय क्रमांक पटकावला. एकाच शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरात पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या यशाबद्दल संस्थेच्या मुख्य सल्लागार देबिका मेघे, मुख्य कार्यकारी अधिकारी आभा मेघे आणि प्राचार्या डॉ. शिल्पा नवासकर यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
सौजन्य:भूषण चावरकर,संपर्क मित्र