शारीरिक शिक्षणामुळे आंतरिक शांती व आत्मनियंत्रण प्राप्त होते : पं. अग्निहोत्री

    दिनांक :16-May-2026
Total Views |
वर्धा, 
भारतीय संस्कृतीत शारीरिक शिक्षणाची सुरुवातच आध्यात्मिक आहे. महर्षी पतंजलींच्या योगसूत्रात आसन, प्राणायाम, प्रत्याहार हे आठ अंग सांगितले आहेत. ते शारीरिक व्यायामाद्वारे मनाची शुद्धी करतात. शारीरिक शिक्षण हे केवळ शरीराची ताकद वाढवणारे साधन नसून आत्म्याच्या जागृतीचे आणि आध्यात्मिक उन्नतीचे अनमोल साधन आहे, असे प्रतिपादन Shankar Prasad Agnihotri पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी केले.
 
 
Agnihotri
 
Shankar Prasad Agnihotri  ते राणीबाई अग्निहोत्री शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात बोलत होते. ते पुढे म्हणाले, शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही तर नैतिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि नेतृत्वघटनेसाठी आहे. त्यामुळे शिक्षण समाजहितासाठी वापरल्यास सामाजिक समरसता व न्याय वाढतो. व्यक्तीचा आत्मसन्मान व विश्वास वृद्धिंगत होतो असे ते यावेळी म्हणाले. यावेळी प्राचार्य डॉ. निरजसिंह यादव, डॉ. अनिल महल्लं, डॉ. गुजरकर आदी उपस्थित होते.