शंकरनगर नागरिक सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षपदी संजय पत्की

    दिनांक :16-May-2026
Total Views |
नागपूर,
Shankarnagar Citizens' Cultural Association शंकरनगर नागरिक सांस्कृतिक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावर्षी सभेला विक्रमी संख्येने सभासद उपस्थित होते. सभेत वस्तीतील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
 

qw 
 
सभेचे नियमित कामकाज पूर्ण झाल्यानंतर मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष अँड. शरदराव घाटे यांनी वयोमानामुळे आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर आजीवन सदस्य संजय विठ्ठलराव पत्की यांची सर्वानुमते अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच सचिवपदी मिलिंद शिरपूरकर, सहसचिवपदी प्रशांत धर्माधिकारी आणि कोषाध्यक्षपदी अनिरुद्ध वाळके यांची निवड करण्यात आली. सभेनंतर उपस्थित सभासदांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
सौजन्य:महेश मोळकर,संपर्क मित्र