मोताळ्यात स्टेट बँकेचे एटीएम फोडले सात लाखाची रोकड लंपास

    दिनांक :16-May-2026
Total Views |
मोताळा :
State Bank ATM Burglarized in Motala मलकापूर बुलढाणा महामार्गावरील मोताळा तहसील समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास फोडून त्यातील अंदाजे सात लाख रुपयांची रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. एटीएम फोडल्याची घटना सकाळी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच बोराखेडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी घटनेचे गांभीर लक्षात घेत घटनास्थळी भेट दिली व तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. फॉरेन्सिक टीम ,
 
atm
State Bank ATM Burglarized in Motala  एलसीबी चे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर हे घटनास्थळावर उपस्थित होते. हे एटीएम केंद्र पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असतानाही एटीएम फोडल्याची धाडसी चोरी झालेली आहे. ज्यामुळे बोराखेडी पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या मोताळा परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून चोरांची हिंमत प्रचंड वाढली असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. कडक सुरक्षेचा अभाव, पोलिसांचा वचक कमी असणे, गस्त पथकाची कमतरता असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले असे असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढत असून पोलिसांचा पूर्वीसारखा वचक राहिला नसल्याचे बोलले जात आहे.