तळेगाव (शा. पंत),
चार दिवसापूर्वी मुलगा रवींद्रचा अपघात मृत्यू झाला. मुलाचा तिसरा दिवस करून आल्यानंतनर मुलाच्या आठवणीत सायंकाळी वडील रामदास यांनी गळफास घेऊन Suicide आत्महत्या केली. मुलगा रवींद्र ठाकरे (३५) हा वरुड जि. अमरावती येथुन परत येत असताना धाडी गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात रवींद्रचा मृत्यू झाला. म्हातारपणीचा आधार हरपल्याने नैराश्यात गेलेल्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
Suicide वडिलोपार्जित रामदास ठाकरे तीन एकर शेती व मजुरी करून संसारात चालवत होते. वन्य प्राणी शेतीचे नुकसान करीत होते. दरम्यान, लहान मुलगा रवींद्रंने वडील म्हातारे झाले म्हणून आराम कायला सांगत स्वत: मजुरी सुरू केली. ११ रोजी रवींद्रच्या दुचाकीला अपघात होऊन त्याच त्याचा मृत्यू झाला. मुलाचा तिसरा दिवस होताच मुलाच्या आठवणीत त्यांनी १५ रोजी रात्री ११ वाजता टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.