हिंगणघाट,
Town Council President Dr. Nayana Tulaskar वेट फॉर अॅनिमल या संघटनेच्या वतीने राजेश्री देवढे यांनी शहरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी १५ जानेवारी रोजी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांच्याकडे केली होती. त्या मागणीवर सविस्तर अभ्यास करीत त्या निवेदनाची दखल घेत नगर पालिका व वेट फॉर अॅनिमल यांच्या संयुत वतीने शहरातील भटया कुत्र्यांच्या प्रजनन नियंत्रणासाठी नसबंदी शस्त्रक्रिया व रेबीज लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Town Council President Dr. Nayana Tulaskar या मोहिमेमध्ये भटया श्वानांवर वैज्ञानिक पद्धतीने नसबंदी शस्त्रक्रिया व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार असून शहर अधिक सुरक्षित तसेच आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करत जागरूकता निर्माण करण्यात यावी, असे आवाहन नगर पालिका अध्यक्षा डॉ. नयना तुळसकर यांनी केले आहे.