चंद्रपूर,
‘Ultraman Australia’ competition 9, 10 आणि 11 मे रोजी ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या ‘अल्ट्रा मॅन ऑस्ट्रेलिया’ या स्पर्धेत चंद्रपूरच्या डॉ. प्राजक्ता यांनी भाग घेतला. ही स्पर्धा जगातील कठीण अशी स्पर्धा समजली जाते. यात जगभरातील एकूण 39 स्पर्धक सहभागी झाले होते. भारतील आठ स्पर्धक असून, त्यापैकी डॉ. प्राजक्ता अस्वार या एकमेव स्त्री स्पर्धक होत्या, ज्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे.
‘Ultraman Australia’ competition या स्पर्धेत पहिल्या दिवशी दहा किलोमीटर जलतरण आणि 145 किलोमीटर सायकलिंग करायचे होते. दुसर्या दिवशी 172 किलोमीटर सायकलिंग व तिसर्या दिवशी 84.3 किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते. यापूर्वीही डॉ. अस्वार यांनी वेगवेगळ्या देशातील आयरन मॅन जर्मनी, फिनलड, बसलटप, इस्टोनिया गोवा पूर्ण केलेले आहेत. त्यांच्या या स्पर्धेतील यशाबद्दल आयएमए चंद्रपूर अध्यक्ष डॉ. प्रसाद पोटदुखे, सचिव डॉ. ऋजुता मुंधडातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.