अनिल कांबळे
नागपूर,
unemployed youth cheated वनविभागात नाेकरी लावून देण्याची बतावणी करत बेराेजगार तरुणाला तब्बल 9 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणाप्रतापनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अजय विजय श्रृंगारे (25, कामगार काॅलनी, सुभाषनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. ताे सरकारी नाेकरीच्या शाेधात हाेता. नातेवाइकांच्या माध्यमातून त्याची ओळख आराेपी विश्वनाथ विठ्ठल गच्चे (धर्मापूर, छत्रपती संभाजीनगर) याच्याशी झाली. आराेपीने स्वतःकडे माेठ्या अधिकाऱ्यांपर्यंत संपर्क असल्याचे सांगत सरकारी नाेकरी सहज लावून देऊ शकताे असा दावा केला. गच्चेने त्याची ओळख सूरज प्रभाकर वंझालकर (यवतमाळ) याच्याशी करून दिली. 2 फेब्रुवारी 2025 राेजी गच्चेने फोन केला व तुला नाेकरी लावून देताे, तू मुंबईला ये असे म्हटले. त्यानुसार अजय काका व वडिलांसाेबत मुंबईला गेला. तेथे गच्चेने 12 लाखांत वनविभागात नाेकरी लावून देताे असे म्हटले. त्याच्या बाेलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने एक लाख रुपये अॅडव्हान्समध्ये दिले. आराेपीने त्याला नाशिकला नाेकरी लावून देताे असे सांगितले. एप्रिल महिन्यात अजय गच्चेच्या सांगण्यावरून नाशिकला गेला व आठवडाभर तेथे राहिला.unemployed youth cheated त्यानंतर आराेपीने अजयला जाॅईनिंग लेटर दिले व रामटेक येथे रुजू व्हावे लागेल असे सांगितले. दरम्यान, त्याने अजयकडून आणखी पाच लाख रुपये सूरजच्या खात्यात वळते करायला सांगितले. त्यानंतर अजय रामटेकला गेला व तेथे तथास्तु हाॅटेलमध्ये आराेपीने त्याला ठेवले. तेथे त्याची हजेरीदेखील घेण्यात आली व त्याच्याकडून अडीच लाख रुपये राेखदेखील घेतले. मात्र, 12 ते 15 दिवस कुठल्याही प्रशिक्षणासाठी पाठविले नाही. अखेर अजय घरी परत गेला. आराेपींनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर त्याने पाेलिसांत तक्रार केली. पाेलिसांनी आराेपींविराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.