केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
विमानतळ आधुनिकीकरणातील महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल गडकरींचा गौरव
नागपूर,
Union Minister Nitin Gadkari डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या मालकीची व मिहान इंडिया लिमिटेडला भाडेपट्ट्याने आलेल्या जमिनीच्या लीज कालावधीवाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर सार्वजनिक भागीदारी मॉडेलअंतर्गत विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर विमानतळाच्या आधुनिकीकरणामुळे प्रवासी वाहतूक, कार्गो सेवा, गुंतवणूक, पर्यटन तसेच रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरण गती देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी) तर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शनिवारी सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी ते बोलत होते.
लॉजिस्टिक्स हब विकसित होणार
Union Minister Nitin Gadkari विमानतळाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी मिळावी यासाठी एआयडी तर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने नागपूरला मध्य प्रमुख विमान वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी नागपूर विमानतळाचे आधुनिकीकरण महत्त्वाचे असल्याची भूमिका गडकरी यांनी केंद्र सरकारसमोर ठामपणे मांडली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंदर्भात घेतलेला निर्णय हा या प्रयत्नांची फलश्रुती मानला जात आहे. याप्रसंगी एआयडीचे अध्यक्ष आशिष काळे, विजय कुमार शर्मा, प्रशांत उगेमुगे, महेंद्र क्षीरसागर, अशोक गोयल, घुशे, निर्भय संचेती आदी उपस्थित होते.