चीन-तैवान संघर्षात अमेरिका उतरणार नाही

जिनपिंग यांच्या भेटीनंतर ट्रम्प यांची स्पष्टोक्ती दोन्ही देशांनी मुत्सद्देगिरीने तोडगा काढावा

    दिनांक :16-May-2026
Total Views |
वॉशिंग्टन
Trump तैवानच्या मुद्यावरून भविष्यात संघर्षाची परिस्थिती उद्भवल्यास अमेरिका यात प्रत्यक्ष सहभागी होणार नाही. चीन-तैवानने मुत्सद्देगिरीने तोडगा काढावा, अशी आमची भूमिका असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन दौèयावरून परतल्यानंतर स्पष्ट केले.
 
trump-jinping 
Trump तैवानवरून चीनला वेळोवेळी धमक्या देणारे ट्रम्प राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीनंतर नरमल्याचे दिसून येत आहे. वॉशिंग्टन येथे चीन दौèयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की, जिनपिंग यांच्यासोबत माझी अनेक विषयांवर चर्चा झाली. व्यापारी अडथळे आणि जागतिक प्रश्नांवरील बहुतांश मुद्यांवर आम्ही सहमत आहे. चीन-तैवान तणावावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, तैवानवरून भविष्यात संघर्ष उद्भवल्यास अमेरिकेत त्यात सहभागी होणार नाही. दोन्ही देशांनी मुत्सद्देगिरीने तोडगा काढावा. अमेरिकेला सध्या युद्धाची अजिबात गरज नाही, विशेषतः 9,500 मैल दूर असलेल्या युद्धाची तर, अजिबातच नाही. तैवानच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढ्याला जिनपिंग यांचा तीव्र विरोध आहे. अशी कृती धोकादायक संघर्षासाठी कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे अमेरिका तैवान मुद्यावरून दूर राहणार आहे.
Trump  इतिहासात झालेल्या कराराशी देणेघेणे नाही
पत्रकारांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी 1982 मध्ये तैवानला दिलेल्या आश्वासनाबद्दल विचारले असता, ट्रम्प म्हणाले, 1982 ही खूप जुनी गोष्ट आहे. इतिहासात झालेल्या कराराशी मला देणे-घेणे नाही. अमेरिकेला आता कोणत्याही नव्या संघर्षात पडायचे नाही. तैवानसोबत झालेल्या शस्त्रविक्री कराराबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देणे टाळले.
Trump पाकिस्तानच्या विनंतीवरून युद्ध थांबवले
पाकिस्तानप्रती मैत्रीचे प्रतीक म्हणून अमेरिकेने इराणविरोधातील युद्ध थांबवले. निर्बंधांमधून सूट हवी असल्यास इराणने अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा. इराणला अणुशस्त्रे मिळवण्याची कधीही परवानगी देणार नाहीत. त्यांनी अनेक वर्षांपासून जमा केलेले समृद्ध युरेनियम पूर्णपणे सोडून द्यायला हवे. जिनपिंग हे देखील होर्मुझ सामुद्रधुनी व्यापारासाठी खुली करण्याच्या बाजूने असल्याचे ट्रम्प म्हणाले.