देऊळगाव राजा :
Volleyball Tournament धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ३६९ वा जन्मोत्सव सोहळा निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देऊळगाव मही यांच्या वतीने भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, विद्येची देवता माता सरस्वती तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा नेते गणेशजी नागरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेशजी नागरे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्यासह अभाविप नगरमंत्री ओम शिंगणे, कार्यक्रम संयोजक दिवेश पिसे व संतोष गुंलाडू उपस्थित होते.
Volleyball Tournament या स्पर्धेमध्ये पाच संघांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये पुढील निकाल लागले
बुलढाणा येथील “जय बजरंग” संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
सुरा येथील “पीके 11 सुरा” संघाने द्वितीय क्रमांक मिळविला.
देऊळगाव मही येथील “वॉरियर्स” संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
विजेत्या संघांना अनुक्रमे प्रथम ₹5,000, द्वितीय ₹3,000 व तृतीय ₹2,000 पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व सहभागी खेळाडूंना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.