इंझाळा येथे लोकसहभागातून जलदिंडी काढून श्रमदान

    दिनांक :16-May-2026
Total Views |
पुलगाव, 
Voluntary Labor at Inzhala नजिकच्या इंझाळा येथे नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत ग्रामपंचायत इंझाळा येथे लोकसहभागातून जलदिंडी काढून श्रमदान करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागिय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे, प्रकल्प सहाय्यक निलेश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली जल व मृद संधारण जनजागृती व प्रचार प्रसिद्धी करण्याच्या उद्देशाने लोकांच्या सहभागातून जलदिंडी काढून श्रमदानाची मोहीम राबविण्यात आली.
 
 
Inzhala
 
Voluntary Labor at Inzhala  जलदिंडी मध्ये गावातील महिला मंडळांनी डोयावर पाण्याची घागर घेऊन, भजने म्हणत माती अडवा-पाणी जिरवा, आधुनिक शेती शाश्वत शेती, शाश्वत शेती समृद्ध शेतकरी... अशा घोषणा दिल्या. चौकाचौकात माती व पाणी विषयी महत्त्व पटवून देण्यात आले. लोकसहभागातून ग्रामपंचायतच्या बाजूला शोष खड्डा करून जल संधारण विषयी लोकांना महत्त्व पटवून दिले. नैसर्गिक संसाधन संपत्तीचे जतन व संवर्धन कसे करायचे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी आर. एस. कोरडे, डी. एस. राठोड, सहाय्यक कृषी अधिकारी व्हि. एस. खैरकर, ए. वाय. कटरपवार, मसराम, समूह सहायक राधिका अडसोड, भारती सावरकर, वनिता उईके, आश्विनी डहाके यांनी सहकार्य केले.