हवामान तज्ञ पंजाब डख उद्या आर्णीत

    दिनांक :16-May-2026
Total Views |
शेतकरी मेळावा व हवामान चर्चासत्र

आर्णी :
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध Weather expert Punjab Dakh हवामान तज्ञ पंजाब डख यांच्या कार्यक्रमाचे आर्णी शहरातील श्री. म. द. भारती विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, 17 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने अल निनो व निनो या चक्रीवादळामुळे पावसाळ्यात पडणाèया पावसावर मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे.
 
 
panjab dakh
 
Weather expert Punjab Dakh  यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पावसाची काय परिस्थिती राहणार याची माहिती होण्यासाठी किसनराव इंगळे सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद इंगळे, संतोष श्रीवास व राजेश श्रीवास यांच्या माध्यमातून हवामान तज्ञ पंजाब डख यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकèयांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.