वणी,
AMRUT 2.0 Water Supply Scheme वणी शहरात सुरू असलेल्या अमृत 2.0 पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथ गतीने, निष्काळजीपणे आणि नागरिकांना त्रासदायक पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करत नगरसेवकांनी मुख्याधिकाèयांना निवेदन दिले आहे. योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात कुचराई होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
शहरातील विविध भागांमध्ये रस्ते खोदून दीर्घकाळ तसेच सोडून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना धूळ, चिखल, वाहतूक कोंडी तसेच अपघातांच्या धोक्याला सामोरे जावे लागत आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडचणींमध्ये अधिक भर पडत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले. तसेच संबंधित कामासाठी कमी मनुष्यबळ, अपुरी तांत्रिक यंत्रणा आणि नॉन-टेक्निकल सुपरवायझर यांच्या माध्यमातून काम सुरू असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले.
AMRUT 2.0 Water Supply Scheme यावेळी संबंधित ठेकेदार व अधिकाèयांवर कारवाई करावी, कामाची उच्चस्तर चौकशी करावी, गुणवत्तापूर्ण काम सुनिश्चित करावे, खोदलेले रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत तसेच निश्चित कालमर्यादेत योजना पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना नगरसेवक तथा गटनेते सुधीर थेरे, अजय धोबे, रसूल रंगरेज, प्रणाली देऊळकर, किरण देरकर, अनिकेत बदखल, शत्रुघ्न मालेकर, शंकर देरकर आदी उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविल्या नाहीत तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नगरसेवकांनी यावेळी दिला.