होर्मुझमधील जहाजांवरील हल्ले अस्वीकारार्ह

संयुक्त राष्ट्रांत भारताने इराणला ठणकावले आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पालन करण्याची मागणी

    दिनांक :17-May-2026
Total Views |
न्यूयॉर्क
Hormuz होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर होणार हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे, नागरी कर्मचाèयांचे जीवन धोक्यात घालणे आणि सागरी वाहतुकीत अडथळा आणणे हे पूर्णपणे अस्वीकारार्य असल्याची भूमिका मांडत इराणच्या कृतीवर भारताने नाराजी व्यक्त केली.
 
uno 
Hormuz संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या विशेष बैठकीला संबोधित करताना भारताचे स्थायी प्रतिनिधी, पी. हरीश यांनी पश्चिम आशियाई संघर्षाच्या पृष्ठभूमीवर ऊर्जा आणि खतांच्या संकटावर भारताची भूमिका मांडता हरीश म्हणाले, व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि नागरी कर्मचाèयांचे जीवन धोक्यात घालणे हे अस्वीकारार्ह आहे.

Hormuz इराणने सुरक्षित सागरी मार्गांशी संबंधित आंतरराष्ट्रीय कायद्यांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे. सध्याच्या संकटाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी अल्पकालीन आणि संरचनात्मक उपाययोजना आवश्यक आहेत. जलमार्गातील वाहतुकीला अढथळा आणणे आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असून, यामुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात येण्याचा धोका बळावला आहे.