२४ तासांत चोरटा जेरबंद

    दिनांक :17-May-2026
Total Views |
देवळी, 
Deoli Theft Case देवळी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या २४ तासात छडा लावत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून तुरीचे सहा कट्टे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि रोख असा १ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खर्डा येथील विकास भेंडे यांच्या अंगणात ठेवलेले तुरीचे कट्टे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. फिर्यादीने ९ मे रोजी कट्ट्यांची मोजणी केली असता १० कट्टे कमी आढळून आले. याप्रकरणी देवळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
 
 
deoli
 
Deoli Theft Case  पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत तपास सुरू केला. तपासादरम्यान रविंद्र शिवणकर (रा.खर्डा) व विनोद राजूरकर रा. गलमगाव, जि. यवतमाळ यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले आणि देवळीचे पोलिस निरीक्षक अमोल मंडालकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकातील नितीन तोडासे, श्याम गावणे, सागर पवार, राजेंद्र नवथळकर यांनी केली.