शल्यचिकित्सक डॉ. विजय पोटे यांचे निधन

    दिनांक :17-May-2026
Total Views |
यवतमाळ, 
Dr. Vijay Pote Passes Away येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी असोसिएट प्रोफेसर व सर्जरी विभाग प्रमुख आणि जिल्ह्यातील ख्यातनाम सर्जन डॉ. विजय दत्तात्रय पोटे यांचे रविवार, 17 मे रोजी पहाटे 4 वाजता निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी मंजूषा, अभियंता केतन व डॉ. पारिजात ही मुले आणि मोठा परिवार आहे.
 
 
vijay
 
मूळचे नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील संघ परिवारीतील पोटे परिवारातील डॉ. विजय पोटे गेल्या 35 वर्षांपासून यवतमाळमध्ये स्थायिक झाले होते. यवतमाळ शहरात कॅन्सर शस्त्रक्रिया सर्वप्रथम सुरू करण्याचे श्रेय डॉ. विजय पोटे यांना जाते. कर्करोग संबंधित शस्त्रक्रियांचे तंत्र अवगत करण्यासाठी त्यांनी मुंबई येथील प्रसिद्ध ‘टाटा कॅन्सर हॉस्पिटल’मधून विशेष प्रशिक्षण घेतले होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्या आहेत. कर्करोगाच्या विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात त्यांचा हातखंडा होता.
 
 
Dr. Vijay Pote Passes Away  रुग्णसेवेसोबतच आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असलेल्या डॉ. पोटे यांचा येथील कीर्तन महोत्सव आयोजनात मोठा सहभाग असे. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे रुग्णांमध्ये ते अत्यंत प्रिय होते. डॉ. विजय पोटे यांच्या आकस्मिक निधनामुळे यवतमाळकरांमध्ये हळहळ आहे.