जिनेव्हा
Ebola Viru कांगो आणि युगांडा या आफ्रिकन देशांमध्ये इबोला विषाणूने पुन्हा एकदा गंभीर रूप धारण केले आहे. काँगोच्या पूर्वेकडील इटुरी प्रांतात इबोला संसर्गामुळे 24 तासांत 84 रुग्णांचा मृत्यू झाला, तर 246 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ)जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. तथापि हा आजार साथीच्या श्रेणीत येत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Ebola Viru हा संसर्ग बंडिबुग्यो विषाणूमुळे पसरत असून, सध्यातरी याला जागतिक महामारी घोषित करण्याचे निकष लागू होत नसल्याचे डब्ल्यूएचओने निवेदनात नमूद केले आहे. काँगोचे आरोग्य मंत्री सॅम्युअल-रॉजर कंबा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, इबोला संसर्गामुळे 24 एप्रिल रोजी एका परिचारिकेचा मृत्यू झाला, त्यानंतर आठ रुग्णांना आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रुग्णांचा आकडेवारी सातत्याने वाढत आहे. इबोलाच्या बुंडीबुग्यो स्ट्रेनच्य प्रकरणांची पुष्टी झाली आहे. गेल्या 24 तासांत 84 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 246 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Ebola Viru सध्या इटुरी प्रांतातील बुनिया, रवामपारा आणि मोंगवालू या भागांत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. इटुरी प्रांताची राजधानी बुनिया येथे लोकांनी भीतीचे वातावरण आहे. गेल्या एका आठवड्यापासून सतत मृत्यू होत आहेत. सुरुवातीला लोकांना हा कोणता आजार आहे हेच समजले नाही आणि त्यांनी दुर्लक्ष केल्याने रुग्णांत सातत्याने वाढ झाल्याचे कंबा म्हणाले. कांगोपाठोपाठ युगांडा, सुदान या शेजारी देशांमध्येही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Ebola Viru पहिल्यांदा 1976 मध्ये आढळला रुग्ण
जगभरात इबोला विषाणूने बाधित असलेला पहिला रुग्ण 1976 मध्ये आफ्रिकेत समोर आला होता. त्यावेळी सुदान आणि तत्कालीन झैरे (आता डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो) मध्ये याची प्रकरणे आढळली होती. काँगोमध्ये ज्या भागात हा व्हायरस आढळला, त्याच्या जवळून वाहणाèया इबोला नदीच्या नावावरून त्याला हे नाव देण्यात आले.
Ebola Viru दहा वर्षांपूर्वी 11 हजार नागरिकांचा मृत्यू
2014 ते 2016 दरम्यान पश्चिम आफ्रिकेत पसरलेला इबोला इतिहासातील सर्वात मोठा उद्रेक होता. या काळात 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. लस आणि उपचार विकसित झाल्यामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत झाली, परंतु वेगवेगळे स्ट्रेन समोर आल्याने आव्हान वाढते.
Ebola Viru इबोला कसा पसरतो?
इबोला हा अत्यंत धोकादायक विषाणूमुळे होणारा आजार आहे. हा संसर्ग तसा दुर्मिळ असला तरी तो कमालीचा तीव्र आणि बहुतांश प्रकरणांमध्ये जीवघेणा ठरतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील द्रव्यांच्या थेट संपर्कात आल्यामुळे एका व्यक्तीकडून दुसèया व्यक्तीकडे वेगाने पसरतो. इबोलावर अद्याप कोणताही निश्चित किंवा खात्रीशीर उपचार उपलब्ध नाही. मात्र,संसर्गाला रोखण्यासाठी प्रभावी लस उपलब्ध आहे.