नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही

    दिनांक :17-May-2026
Total Views |
पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश

यवतमाळ, 
Guardian Minister Sanjay Rathod नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष सहन केले जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाèयांना दिले. दिग्रस, दारव्हा आणि नेर तालुक्यातील नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या निवेदन व तक्रारींच्या अनुषंगाने ते बोलत होते.
 

palakmantri 
 
Guardian Minister Sanjay Rathod  या तक्रारींवर झालेल्या कार्यवाहीबाबत दिग्रस येथील राजेश्वर मंगल कार्यालय आणि दारव्हा व नेर येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकांमध्ये नागरिकांच्या विविध समस्यांवर संबंधित अधिकाèयांशी सविस्तर चर्चा करून अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले. तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तातडीने करून नागरिकांना दिलासा देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाèयांना दिल्या. तसेच कामातील अनावश्यक विलंब आणि नागरिकांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष यापुढे सहन केले जाणार नाही. नागरिकांची कोणतीही तक्रार प्रलंबित राहू नये तसेच प्रत्येक प्रकरण संवेदनशीलतेने आणि तातडीने हाताळले जावे, असे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाèयांना दिले.

‘ऑन दि स्पॉट’ निकाल..!
यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी काही महत्त्वाच्या विषयांवर थेट मंत्रालयातील सचिवांना संपर्क साधून नागरिकांचे प्रश्न ‘ऑन दि स्पॉट’ निकाली काढले. या धडक कार्यवाहीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्र्यांच्या काम करण्याच्या शैलीचे कौतुक केले.