तापत्या विदर्भाला सतर्कतेचा इशारा

    दिनांक :17-May-2026
Total Views |
- दुपारच्या कार्यक्रमांवर प्रशासनाची कडक बंदी
- प्रशासनाने जारी केले कडक निर्देश

नागपूर, 
Heatstroke: Alert Issued for Vidarbha विदर्भात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये संभाव्य उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आल्यानंतर विभागीय प्रशासनाने सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे आदेश जारी केले आहेत.
 
nnn
 
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष आढावा बैठकीत उष्णतेच्या तीव्रतेचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. हवामान विभागाच्या सूचनांनुसार शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, कार्यालये आणि इतर संस्थांना विद्यार्थ्यांसह कर्मचारी वर्गाच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
उष्माघात आणि निर्जलीकरणाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शीत कक्ष उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच उष्णतेशी संबंधित आजारांवरील उपचारांसाठी आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवण्यावरही प्रशासनाने भर दिला आहे.
Heatstroke: Alert Issued for Vidarbha  नागपूर महानगरपालिकेकडून प्रमुख चौकांमध्ये हिरव्या जाळ्या लावणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी वर्गांनाही विशेष सुरक्षा सूचना देण्यात आल्या आहेत.
विदर्भात मे आणि जून महिनाभर उष्णतेच्या लाटेचा धोका कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्माघाताची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाने जनजागृती मोहिमांनाही वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.