अरुणोदय सोसायटीत हायव्होल्टेज शॉक

    दिनांक :17-May-2026
Total Views |
जीनस कंपनीचा वीज ग्राहकांच्या जीवाशी खेळ
मोटर पंप, फ्रिज, कुलर विद्युत उपकरणे निकामी

यवतमाळ, 
High voltage shock in Arunodaya Society यवतमाळच्या अरुणोदय सोसायटीत रविवार, 17 मे रोजी दुपारी अचानक 440 व्होल्टचा विद्युत प्रवाह घरांमध्ये आला. एकापाठोपाठ एक विद्युत उपकरणे निकामी झाली. अनेकांना विजेचा झटका बसला. आरडाओरड करीत रहिवासी घराबाहेर पडले. विद्युत डीपी मधून जाळ निघाला. हा सर्व प्रकार महावितरणचे डिटीसी मीटर लावणाèया जिनस कंपनीच्या कर्मचाèयांच्या भोंगळ कारभारामुळे होत असल्याचे लक्षात आले. वास्तविक पाहता जीनस कंपनीने वीज ग्राहकांच्या जीवाशी खेळ केला.
 
 
shock
 
यवतमाळमध्ये वीज ग्राहकांना पूर्वकल्पना न देता जीनसचे नवीन मीटर बसवले जात आहेत. प्रत्येक डीपीवर जीनसचे डिटीसी मीटर देखील लावल्या जात आहे. महावितरणने डिटीसी मिटर लावण्यासाठी जीनस कंपनीला कंत्राट दिले आहे. मात्र कंपनीने या कामासाठी अप्रशिक्षित कामगार नेमले. त्यांच्या मनमानी कारभारामुळे अरुणोदय सोसायटीतील अनेकांच्या जीवाशी खेळ झाला व महागडी विद्युत उपकरणे निकामी झाली. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.
 
 
High voltage shock in Arunodaya Society  जिनस कंपनीच्या अप्रशिक्षित कामगारांनी डीपीवर डीटीसी मीटर बसविण्यासाठी शट डाऊन केले, मीटर बसवताना रोहित्रावरील इन्कमिंग केबल बदलला, आरवायबी फेजच्या कनेक्शनमध्ये न्यूट्रल वायर जोडला या गंभीर चुकीमुळे वीज ग्राहक 440 व्होल्टच्या धक्क्याने हादरले. पाण्याचे मोटर पंप, टीव्ही, फ्रिज, कुलर, पंखे, एसी, सेट टॉप बॉक्स निकामी झाले. अनेकांना विजेचा जोरदार शॉक बसला. नागरिकांनी महावितरणच्या कर्मचाèयांशी संपर्क साधला. जीनस कंपनीचे स्थानिक कंत्राटदार देखील पोहोचले. मात्र वीज पुरवठा सुरळीत करण्याऐवजी त्यांच्यात आपसातच वाद सुरू झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.

जीनस कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी व कर्मचारी मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. त्यांनी या धोकादायक कामासाठी अकुशल अप्रशिक्षित कर्मचारी नेमल्याची बाब पुढे आली. त्यांच्या चुकीमुळे अनेकांचे प्राण धोक्यात आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. मात्र त्यांचे समाधान करण्याऐवजी जीनसच्या कर्मचाèयांनी वीज ग्राहकांशी हुज्जत घातली. झालेल्या चुकी बाबत महावितरणवर खापर फोडले.

नागरिकांनी घडलेल्या दुर्घटनेबाबत महावितरणच्या स्थानिक सहाय्यक अभियंत्याशी संपर्क केला. मात्र त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधित अधिकाèयांना घटनास्थळी पाठविले. मात्र अनेक तास उलटून गेल्यानंतर ते पोहोचले. त्यामुळे नागरिक खंडित विद्युत पुरवठा आणि झालेल्या दुर्घटनेमुळे संतप्त झाले होते. मीटर बसविण्याचे महत्त्वाचे काम करतेवेळी महावितरणचे जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते, सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत शट डाऊन ठरले असतानाही ते पावणेदहा वाजता सुरू झाले. या भागात ट्रि कटिंग देखील झाले नसल्याची बाब समोर आली. नागरिकांचे झालेले नुकसान भरपाई देण्यासंदर्भात ताबडतोब कारवाई करण्यात येईल, असे यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता मांगीलाल राठोड यांनी सांगितले.