जिल्ह्यात आयटीआयच्या 4 हजारांवर जागा

    दिनांक :17-May-2026
Total Views |
दहावीची गुणपत्रिका येताच प्रवेशप्रक्रिया

यवतमाळ, 
दहावीचा निकाल लागल्यानंतर अनेकांना विविध अभ्यासक्रमांचे वेध लागले आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातील ITI Seats आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांसाठी तब्बल 4 हजार 812 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी गुरुवार, 21 मे पासून ऑनलाईन नोंदणी सुरु होत असून दहावीची गुणपत्रिका येताच प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.
 
 
Iti
 
जिल्ह्यात 18 शासकीय आणि 4 खाजगी अशा एकूण 22 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. त्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये यंदा 4 हजार 564 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. तर 4 खाजगी आयटीआयमध्ये 248 विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. त्यासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना 21 मेपासून नोंदणी करता येणार आहे.
 
 
ITI Seats आठवडाभरापूर्वीच दहावीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण व आपली टक्केवारी कळली आहे. मात्र अद्याप गुणपत्रिका शाळेमार्फत मिळणे बाकी आहे. या गुणपत्रिका आल्यावर आयटीआयमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, प्रवेश अर्जासाठी राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 100 रुपये, खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज भरल्यानंतर उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह जवळच्या आयटीआयमध्ये जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करून अर्ज ‘कन्फर्म’ करावा लागणार आहे. पडताळणीनंतरच प्रवेश अर्ज वैध मानला जाणार आहे. त्यानंतर 1 जूनपासून ट्रेडची निवड करुन तसा प्राधान्यक्रम भरता येणार आहे.