विकासाअभावी कळंब तालुक्याची अवस्था दयनिय

    दिनांक :17-May-2026
Total Views |
कळंब तालुका वार्तापत्र
प्रमोद उरकुडे
Kalamb Taluka राळेगाव विधानसभा क्षेत्रांमध्ये तीन तालुके येतात. त्यातही कळंब तालुका विदर्भातील अष्टविनायकांपैकी चिंतामणी देवस्थानामुळे महत्त्वाचा व धार्मिक तालुका ठरतो. गृत्समद ऋषींनी याच क्षेत्रात कापसापासून धागा तयार करण्याच्या शोध लावला असे सांगण्यात येते. असे असले तरी राजकीय दूरदृष्टीअभावी आर्थिक व विकासात्मक दृष्टीने अतिशय मागास तालुका म्हणून सध्या नावलौकिकास येत आहे. त्यामुळे कळंब तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरिता लाभलेल्या नेतृत्वाने तालुक्याचा तथा मुख्यत्वेकरून कळंब शहराचा विकास होण्याकरिता महत्त्वाची पावले उचलणे गरजेचे आहे.
 
 
Kalamb Taluka
 
कळंब शहराकरिता अतिशय महत्त्वाचा प्रश्न शुद्ध पाणीपुरवठा योजना आहे. ही योजना कित्येक वर्षांपासून मंत्रालयामध्ये भिजत घोंगडे स्वरूपात पडून आहे. तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या बहुतेक शाळांना विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे अवकळा आली आहे. अनेक शाळासुद्धा मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे इंग्रजकालीन अशा या शाळांचे नूतनीकरण करण्याची मागणी होत आहे. शैक्षणिक विकासासोबतच खेळाडूंचा विकाससुद्धा होणे अपेक्षित असताना तालुक्यामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून कोणतेही क्रीडा संकुल नाही. त्याच्या निर्मिती संदर्भात हालचाली होताना दिसून येत नाहीत. यालासुद्धा प्रशासनाची उदासीनताच कारणीभूत आहे. शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, खेळाडू यांना फिरण्यासाठी मैदान उपलब्ध नाही. त्यामुळे कळंब तालुका सर्व दृष्टीने वंचितच राहणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे.
 
 
Kalamb Taluka  एकंदरीतच राजकीय व प्रशासनिक उदासीन धोरणाचा फटका कळंब शहर व तालुक्याला बसत आहे. येथे एमआयडीसी थाटल्या गेली असून रोजगार देणारे उद्योग मात्र उपलब्ध होऊ न शकलेले नाहीत. त्यामुळे एमआयडीसीसुद्धा बेरोजगार तरुणांना वाकुल्याच दाखवत आहे. येणाèया काळात या सर्व मुद्यांचा फटका मतदान मागणाèयाला बसणार यात तीळमात्र शंका नाही.