यवतमाळ,
Kirtankar Varsha Bedekar येथील कीर्तनकार वर्षा वसंत बेडेकर यांचा ज्येष्ठ महिला कीर्तनकार म्हणून करवीर पीठाचे श्रीमद् जगद्गुरू शंकराचार्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्रीमद् जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या 2534 व्या जयंती उत्सव सोहळ्यानिमित्त वर्षा बेडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
Kirtankar Varsha Bedekar कीर्तनकार वर्षा बेडेकर या अनेक वर्षांपासून कीर्तन क्षेत्रात निस्वार्थ व निशुल्क सेवा, कीर्तनाविषयी कळकळ, प्रेम, अभ्यास, अनेक बाल कीर्तनकारांना कीर्तन समजावून शिकवणे, स्वभावातला साधेपणा, आवाजातील गोडवा, यासाठी ओळखल्या जातात. यवतमाळात विद्यार्थी दिवसभरात केव्हाही त्यांच्याकडे कीर्तन शिकण्यास जाऊ शकतो. त्या केव्हाही त्याचे स्वागतच करतात. तरुण व बाल विद्यार्थ्यांच्या मनातील कीर्तनाविषयीची भीती घालवून प्रेम निर्माण करणे यात वर्षा बेडेकर यांचा हातखंडा आहे.