भांब शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह

    दिनांक :17-May-2026
Total Views |
महागाव, 
Leopard's carcass महागाव वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाèया जंगल भागात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बिबट्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्याचे तगडे आव्हान वनविभागासमोर उभे ठाकले आहे. महागाव वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाèया भांब शिवारात जनावरे चरणाèया गुराख्यांना इसमांना दुर्गंधी आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याठिकाणी बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. अंदाजे सात ते आठ दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.
 
 
bittya
(संग्रहित छायाचित्र ) 
 
 
Leopard's carcass याची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेश्वर, वनपाल रविंद्र जाधव यांच्यासह वनरक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानुसार डीएफओ शशांक कदम, एसिएफ ढगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. पशु वैद्यकीय अधिकाèयांना बोलावून त्यांच्याकडून मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून घेतले. तसेच वनविभागाच्या कर्मचाèयांना या बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन वनविभागासमोर उभे राहिले आहे. या बिबट्याचा वाढत्या तापमानाचा परिणाम होवुन उष्माघाताने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.