मोठा अनर्थ टळला! राजधानी एक्सप्रेसला भीषण आग

    दिनांक :17-May-2026
Total Views |
रतलाम,
Massive Fire on Rajdhani Express रतलाम जिल्ह्यातील अलोट स्थानकाजवळ रविवारी पहाटे सुमारे साडेपाचच्या सुमारास तिरुवनंतपुरम ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस या गाडीच्या एका वातानुकूलित डब्यात अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. कोटा रेल्वे विभागातील लुनिरीच्छा आणि विक्रमगड अलोट स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. आग लागलेल्या डब्यात सुमारे अडुसष्ट प्रवासी होते. काही क्षणांतच आगीने डब्याला वेढा घातल्याने परिस्थिती गंभीर झाली, मात्र गार्डने तात्काळ लोको पायलटला सतर्क केले आणि गाडी थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी आणि गाडीतील कर्मचारी यांनी तत्काळ प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अवघ्या पंधरा मिनिटांत संपूर्ण डबा रिकामा करण्यात आला आणि सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर आले.
 
Massive Fire on Rajdhani Express
 
या घटनेनंतर दिल्ली ते मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी ठप्प करण्यात आली तसेच गाडीचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. Massive Fire on Rajdhani Express माहिती मिळताच कोटा विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले. आग लागलेला डबा वेगळा करण्यात आला असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती दिली असून कोणालाही इजा झालेली नाही असे स्पष्ट केले आहे.
 
सौजन्य: सोशल मीडिया 
 
दरम्यान, या घटनेमुळे अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून हरिद्वार ते वांद्रे टर्मिनस गाडी शामगड येथे थांबवण्यात आली, नवी दिल्ली ते इंदूर इंटरसिटी गाडी सुवासरा येथे थांबवण्यात आली, विशेष गाडी नाथू खेडी येथे थांबवण्यात आली, स्वराज्य एक्सप्रेस शामगड येथेच रोखण्यात आली, हजरत निजामुद्दीन ते मुंबई सेंट्रल धावणारी दुरंतो एक्सप्रेस चौमहला येथे थांबवण्यात आली तसेच हजरत निजामुद्दीन ते पुणे विशेष गाडी मोडक स्थानकावर थांबवण्यात आली आहे. Massive Fire on Rajdhani Express या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असून लवकरच वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.