मुंबईत उघड्यावर कुर्बानीला बंदी घालण्याची मागणी

    दिनांक :17-May-2026
Total Views |
मुंबई,
kirit-somaiya : भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुंबईत उघड्यावर प्राण्यांची कुर्बानी देण्यास बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी बीएमसी आणि मुंबई पोलिसांना निवेदन सादर केले आहे.
 
 

kirit 
 
 
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सोसायटी, चाळी किंवा सार्वजनिक ठिकाणी उघडपणे कुर्बानी दिली जाते, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. महापालिकेने यासंदर्भात नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली असली, तरी त्यांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई करावी आणि नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
 
 
सोमय्या यांनी स्पष्ट केले की, कुर्बानी केवळ अधिकृत कत्तलखाने किंवा परवानाधारक ठिकाणीच केली जावी. तसेच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.