मंगळवारपासून धावणार नांदेड - कुर्ला एसप्रेस

    दिनांक :17-May-2026
Total Views |
वाशीम - हिंगोलीकरांना गाठता येणार थेट मुंबई
 
वाशीम, 
Nanded–Kurla Express गेल्या अनेक वर्षांपासूनची वाशीम आणि हिंगोली जिल्हावासीयांची मुंबईसाठीची थेट रेल्वेची मागणी आता पूर्ण झाली आहे. नांदेड-मुंबई (कुर्ला) ही नवीन द्विसाप्ताहिक एसप्रेस येत्या १९ मे पासून प्रवाशांच्या सेवेत रुजू होत आहे. रेल्वे विभागाने या गाडीचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, या सुविधेमुळे विदर्भातील दळणवळण व्यवस्थेला एक नवी गती मिळणार आहे. वाशीम आणि हिंगोली जिल्ह्यातून मुंबईला जाणार्‍या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु, थेट रेल्वे सेवा नसल्याने नागरिकांना खासगी ट्रॅव्हल्स किंवा अकोल्याला जाऊन गाडी पकडावी लागत असे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा खर्च होत असे.
 
 
Nanded–Kurla Express
 
Nanded–Kurla Express त्यामुळे वाशीमकरांना थेट मुंबई गाठण्यासाठी रेल्वे सुरु करावी, अशी मागणी प्रवाशासह लोकप्रतिनिधींनी केली होती. नांदेड रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १७६६५ आणि १७६६७ या नवीन रेल्वे गाड्या नांदेडवरून दर सोमवार आणि बुधवारी रात्री ०९:१५ वाजता सुटतील. ही गाडी पूर्णा येथे रात्री ०९:५५ वाजता पोहोचेल, त्यानंतर वसमत येथे रात्री ११:१४ वाजता थांबून हिंगोली येथे मध्यरात्री १२:२४ वाजता येईल. वाशीम येथील प्रवाशांसाठी ही गाडी मध्यरात्री ०१:१४ वाजता स्थानकावर उपलब्ध असेल. येथून पुढे पुढचा प्रवास करत रात्रीचा प्रवास करून दुसर्‍या दिवशी पहाटे ०४:१४ वाजता वाशीम स्थानकावर पोहोचेल. या सुविधेमुळे केवळ वाशीमच नव्हे तर पुसद, हिंगोली आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचा पैसा, वेळ आणि श्रम वाचणार आहेत. व्यापारी दृष्टिकोनातूनही ही रेल्वे जिल्ह्याच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल.