सिंधू जल करारावरील निकाल भारताने फेटाळला

लवाद न्यायालयाची स्थापना बेकायदेशीर दहशतवादाला पाठिंबा देणाèया पाकिस्तानला पाणी नाही

    दिनांक :17-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
India-pakistan भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार भारताला सीमेवरील पाणी अडवू शकत नाही, असा निकाल हेग येथील लवाद न्यायालयाने शनिवारी दिला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने न्यायालयाचा निकाल फेटाळून लावला.
  
india-pakistan
 
\India-pakistan लवाद न्यायालयाची स्थापना बेकायदेशीर असून, भारताला निकाल अमान्य आहे. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देण्याचे धोरण जोपर्यंत कायम आहे, तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित राहणार आणि सीमापार जाणारे पाणी अडवण्याचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी निवेदनात म्हटले आहे. लवाद न्यायालय बेकायदेशीर असून सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय कायम राहील. तथाकथित न्यायालयाने कमाल पाणी साठवण या मुद्द्यावर दिलेला निकाल भारताला कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही. जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही, तोपर्यंत हा करार स्थगित राहणार आहे.
 
India-pakistan भारताने या तथाकथित लवाद न्यायालयाची स्थापना कधीही स्वीकारली नव्हती. या न्यायालयाने दिलेली कोणतीही कार्यवाही, निर्णय किंवा निकाल पूर्णपणे रद्दबातल आहे. जयस्वाल यांनी पुनरुच्चार केला की, पूर्वीच्या सर्व निर्णयांप्रमाणेच, हा नवीन निर्णय देखील पूर्णपणे अस्वीकारार्य आहे.
India-pakistan  राष्ट्रीय हिताला प्राधान्य
सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय प्रभावी राहणार आहे. भारताने या मुद्यावर आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. राष्ट्रीय हिताला सर्वौच्च प्राधान्य असून कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे जयस्वाल यांनी निवेदनात म्हटले आहे. देशाच्या सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय हिताशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही बाह्य किंवा बेकायदेशीर व्यवस्था स्वीकारली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.