- रात्रीच्या सुमारास वादळी पावसाचा तडाखा
गोंदिया,
onslaught of a stormy downpour गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला असून दोन दिवस उन्ह तापल्यानंतर शनिवारी मध्य रात्रीच्या सुमारास जिल्ह्यात पुन्हा अवकाळी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे एक तास झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे पुढे येत आहे. काल, शनिवारी दिवसभर कडक उन्हाचा सामना गोंदियाकरांनी केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. त्यामूळे दमट वातावरणाचा सामनाही करावा लागला.
onslaught of a stormy downpour त्यात रात्रीच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळ व वीजेच्या कडकडटीसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे, या वादळी पावसाचा देवरी तालुक्याला चांगलाच फटका बसला असून तालुक्यातील ओवारा गावातील जवळपास २० घरांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे वीजवाहिन्यांवर कोसळल्याने वीजपुरवठाही खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्या सुमारास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे, या अवकाळी पावसाचा फटका शेतकर्यांनाही बसला असून धान, मका आणि आंबा पिकांचे पुन्हा चांगलेच नुकसान झाले आहे. दरम्यान, कृषी विभाग आणि महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात येत आहेत.