तेंदुपत्ता लिलावातून २३ लाख ५२ हजाराचा महसूल

    दिनांक :17-May-2026
Total Views |
वर्धा, 
Revenue from Tendupatta बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर क्षेत्राची जबाबदारी वन्यजीव विभागाकडे तर जिल्ह्यातील उर्वरित जंगलाची जबाबदारी प्रादेशिक वनविभागाकडे आहे. यंदा वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रातील केवळ एकाच तेंदुपत्ता युनिटचा लिलाव झाला तर प्रादेशिक वनविभागाच्या कार्यक्षेत्रातील सुमारे १० तेंदुपत्ता युनिटचा लिलाव झाला आहे. या लिलावातून प्रादेशिक वनविभागाला २३.५२ लाखांचा महसूल मिळाला आहे.
 
 

tendu dksls
 
बोर व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्रात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेंदूची झाडे आहेत. तर प्रादेशिक वन विभागाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या जंगल परिसरातही तेंदूची झाडे आहे. उन्हाळ्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम होत असून यंदा बोर व्याघ्र प्रकल्पातील केवळ एक युनिटचा लिलाव झाला आहे. हे युनिट नागपूर जिल्ह्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगण्यात आले. तर वर्धा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील एकाही तेंदुपत्ता युनिटचा यंदा लिलाव झालेला नाही. प्रादेशिक वनविभागाच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या आष्टी वनपरिक्षेत्रातील सत्तरपूर-माणिकवाडा या युनिटचा १ लाख ५६ हजार १८६ रुपयांत लिलाव झाला आहे. त्याठिकाणाहून ५०० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलनाचे उद्दिष्ट आहे. समुद्रपूर वनपरिक्षेत्रात येणार्‍या गिरड या युनिटचा १५ लाख २ हजारांत लिलाव झाला असून तेथून ८०० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलनाचे उद्दिष्ट आहे.
 
 
 
Revenue from Tendupatta  वर्धा वनपरिक्षेत्रात येणार्‍या हिंगणघाट युनिटचा १२ हजार १५१ रुपयांत लिलाव झाला असून तेथून १५० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलनाचे उद्दिष्ट आहे. खरांगणा वनपरिक्षेत्रातील खरांगणा युनिटचा लिलाव ७५ हजार १५१ रुपयांत झाला आहे. तेथून २५० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलनाचे उद्दिष्ट आहे. हिंगणी वनपरिक्षेत्रातील हिंगणी युनिटचा लिलाव ६१ हजार १८६ रुपयांत झाला असून तेथून १०० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलनाचे उद्दिष्ट आहे. आर्वी वनपरिक्षेत्रातील वाढोणा, आर्वी, रोहणा या युनिटचा २ लाखांत लिलाव झाला असून तेथून ६०० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलनाचे उद्दिष्ट आहे. तर याच वनपरिक्षेत्रातील अंजनगाव युनिटचा लिलाव १ लाख ५६ हजार १८६ रुपयांत झाला असून ३०० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलनाचे उद्दिष्ट आहे. हिंगणी वनपरिक्षेत्रातील झडशी-केळझर या युनिटचा लिलाव ४६ हजार १८६ रुपयांत झाला असून २०० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलीत होणार आहे. कारंजा वनपरिक्षेत्रातील कारंजा-गारपीट या युनिटचा १ लाखात लिलाव झाला असून ३०० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलन होणार आहे. तळेगाव वनपरिक्षेत्रातील पारडी-तळेगाव युनिटचा २ लाखात लिलाव झाला असून ७०० प्र-गुणी तेंदुपत्ता संकलनाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
 
 
तेंदू पत्त्याची ७० पुडे म्हणजे १ प्र-गुणी
तेंदूपत्ता संकलन ग्रामीण भागातील होतकरू व्यतींच्या हाताला काम देण्यासाठी उपयुतच ठरते. तेंदू पत्त्याचे ७० पुडे म्हणजे १ प्र-गुणी तर तेंदूच्या ७० पानांचा एक पुडा राहत असल्याचे सांगण्यात आले.