ऋषभ जयस्वाल यांना अमेरिकेत मास्टर ऑफ सायन्स पदवी

    दिनांक :17-May-2026
Total Views |
तिरोडा, 
Rishabh Jaiswal स्थानिक पत्रकार दीपक कुमार जयस्वाल यांचे सुपुत्र ऋषभ जयस्वाल यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी कडून मास्टर ऑफ सायन्स (कॉम्प्युटर सायन्स) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. फिनिक्स येथे पार पडलेल्या भव्य दीक्षांत समारंभात त्यांचा सन्मान करण्यात आला.
 
 
Rishabh Jaiswal
 
Rishabh Jaiswal  ऋषभ हे मूळचे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील असून, प्राथमिक शिक्षण तिरोड्यात झाले. त्यानंतर मुंबईतील व्ही जे टी आय मधून अभियांत्रिकी पदवी पूर्ण करून त्यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले. या उल्लेखनीय यशाबद्दल जयस्वाल कुटुंबावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिरोडा व गोंदिया जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.