मुंबई,
akhri-sawal : अभिनेता संजय दत्त याचा आगामी चित्रपट ‘आखरी सवाल’ सध्या जोरदार चर्चेत आला आहे. एका बाजूला या चित्रपटाचे राष्ट्रपती भवनात विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, दुसऱ्या बाजूला युएईमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आल्याने वाद निर्माण झाला आहे.
माहितीनुसार, हा चित्रपट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) १०० वर्षांच्या इतिहासावर आणि सामाजिक-राजकीय प्रवासावर आधारित आहे. भारतातील सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला युए 16+ प्रमाणपत्र देत प्रदर्शनास मंजुरी दिली होती. मात्र युएई सेन्सॉर बोर्डाने काही दृश्यांमध्ये बदल आणि कट्स सुचवले होते. निर्मात्यांनी हे बदल मान्य करण्यास नकार दिल्याने यूएईमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी मिळाली नाही.
या चित्रपटात संजय दत्तसोबत नमाशी चक्रवर्ती, अमित साध, समीरा रेड्डी आणि मृणाल कुलकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत मोहन वरंग यांनी केले आहे.