पारवा परिसरात पेरणीपूर्व मशागतीला वेग

    दिनांक :17-May-2026
Total Views |
ऐन हंगामात डिझेल अभावी शेतकरी अडचणीत

पारवा, 
Sowing operations in the Parwa पारवा महसूल मंडळातील गावांमध्ये सध्या खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनी चांगलाच वेग घेतला आहे. मात्र, एकीकडे मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असतानाच दुसरीकडे पारवा येथील पेट्रोल पंपावर डिझेल मिळेनासे झाल्याने शेतकèयांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
 
 
mashagat
 
Sowing operations in the Parwa  हवामान विभागाने यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याचा अंदाज वर्तवल्याने शेतकèयांनी कामांना गती दिली आहे. सध्या शेतशिवारात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, वखरणी, बांध दुरुस्ती व शेत सपाटीकरणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. शेतकरी प्रामुख्याने कापूस, सोयाबीन व तूर पिकांच्या पेरणीसाठी जमीन तयार करत आहेत. उन्हाचा कडाका मोठा असला, तरी पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकरी रात्रंदिवस शेतात राबत आहेत. डिझेल टंचाई व वाढत्या खर्चाचे सावट त्यात डिझेलचे वाढते दर, मजुरांची तीव्र टंचाई यामुळे येथील शेतकरी आर्थिक तणावाखाली आहे. अशा परिस्थितीत आता पारवा पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याने ट्रॅक्टरद्वारे होणारी मशागतीची कामे ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. डिझेलसाठी शेतकèयांना इतर ठिकाणी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने डिझेल पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.