ट्रम्प यांचा मोठा निर्णय; जागतिक तेल बाजारात खळबळ

    दिनांक :17-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Turmoil in Global Oil Markets मध्य पूर्वेतील तणाव आणि होर्मुझ सामुद्रधुनीभोवती निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारात पुन्हा अस्थिरता वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीसंदर्भातील तात्पुरती सवलत पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतल्याने भारतासह अनेक देशांसमोर इंधन दरवाढीचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांच्या दरांवर होऊ शकतो.
 
Turmoil in Global Oil Markets
 
रशिया-युक्रेन संघर्षानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियन तेलावर विविध निर्बंध लागू केले होते. मात्र, मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक बाजारात तेलटंचाई निर्माण होऊ लागल्याने अमेरिकेने काही काळासाठी विशेष सवलत दिली होती. Turmoil in Global Oil Markets या सवलतीमुळे काही देशांना रशियन तेलाची आयात सुरू ठेवणे शक्य झाले होते. मात्र युरोपीय देशांच्या दबावानंतर अमेरिकेने ही सवलत रद्द केली आहे.
 
भारतासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे, कारण गेल्या काही महिन्यांत भारताने मोठ्या प्रमाणात रशियन कच्च्या तेलावर अवलंबून राहून ऊर्जा गरजा भागवल्या होत्या. Turmoil in Global Oil Markets पश्चिम आशियातील तणाव वाढल्यानंतर भारताने रशियाकडून तेल आयात वाढवली होती. एप्रिल महिन्यातही रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार राहिला होता. मात्र आता नव्या परिस्थितीत भारताला पर्यायी पुरवठादारांकडे वळावे लागू शकते.
 
दरम्यान, जागतिक बाजारात तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा परिणाम देशांतर्गत इंधन दरांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. Turmoil in Global Oil Markets काही दिवसांपूर्वीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती, तसेच वायू इंधनाचे दरही वाढले होते. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव कायम राहिला तर सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी ताण येऊ शकतो आणि महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.