सामूहिक बलात्कार, छळालाकंटाळून दोन बहिणींची आत्महत्या

राजस्थानच्या जोधपूरमधील घटना

    दिनांक :17-May-2026
Total Views |
जयपूर
Gang Rape राजस्थानमध्ये गेले अनेक वर्षे दोन बहिणींवर सामूहिक अत्याचार केले जात होते. या छळाला कंटाळून दोन्ही बहिणींनी आत्महत्या केली. पोलिसांकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून न्याय न मिळाल्याने या दोन्ही बहिणींनी आयुष्य संपवले. जोधपूरमध्ये मन सुन्न करणारी ही घटना घडली.
 
 
gang rape
 
Gang Rape पोलिसांच्या निष्काळजीपणावर आणि आरोपींवर कारवाई न केल्याचा आरोप मुलींच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडितांच्या वडिलांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींना कडक शिक्षेची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर अनेकांची चौकशी सुरू आहे.
 
Gang Rape लहान बहिणीने 11 एप्रिल रोजी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या मोठ्या बहिणीला स्थानिक ई-मित्र सेवा केंद्र चालक महिपाल याने जाळ्यात ओढले होते आणि तिचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. तक्रारीत महिपालसह शिवराज, गोपाळ, विजाराम, दिनेश, मनोज आणि पुखराज अशा एकूण आठ जणांची नावे घेतली होती.या सर्वांवर तिच्या मोठ्या बहिणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आणि धमक्या दिल्याचा आरोप तिने केला होता. तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आला, परंतु त्यानंतर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप आहे.
 
Gang Rape पाण्याच्या टाकीवरून घेतली उडी
मोठ्या बहिणीच्या आत्महत्येनंतर आरोपींनी लहान बहिणीला लक्ष्य केले. बहिणीचे व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन आरोपींनी तिच्यावरही लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आठ दिवसात तिनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. जोधपूरचे पोलीस अधीक्षकपी. डी. नित्या यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.