शहर वाहतूक शाखेची मोहीम
वाशीम,
Washim Traffic Branch विचित्र व कर्णकश हार्न वाजवून ध्वनीप्रदुषण करणार्या दुचाकी, चाराचाकी व अवजड वाहनधारकांवर वाहतूक शाखेने धडक कारवाई मोहीम हाती घेत दंडात्मक कारवाई केली. वाशीम शहर वाहतुक शाखेने शहरात दुचाकीला मॉडिफाय सायलन्सर लावून कर्कश आवाज काढणार्या व ध्वनी प्रदुषण करणार्या वाहनावर वाहतुक शाखेने धडक कारवाई केली. या विशेष मोहीमेव्दारे १० चारचाकी तसेच अवजड वाहन कर्कश हॉर्न वाजविणार्या वाहनधारका विरूध्द कारवाई करण्यात आली आहे.
Washim Traffic Branch सदर मोहीम ही यापुढे देखील वेळोवेळी राबविण्यात येणार आहे. नागरीकांना अशा पध्दतीने वाहनधारक कर्ण कर्कश हॉर्नचा वापर करत असल्याचे दिसल्यास शहर वाहतुक शाखा वाशीम यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन वाहतुक विभागामार्फत करण्यात आले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नाईक, पोलिस अंमलदार सुनील वाणी, दिपक मुळे, विष्णु साबळे, राहुल गवई, शिवकुमार घुगे, प्रविण जाधव, मनिषा चौके, ज्योती इंगोले, शालु इंगळे यांनी केली आहे.